पिंपरी चिंचवड शहरवासियांसह पवनमावळातील नागरिक, शेतकरी आणि लहानसहान उद्योगधंदे करणाऱ्या व्यवसायिकांसाठी अत्यंत महत्वाची तितकीच चिंतेची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पवनमावळ भागातील नागरिकांची तहान भागवणारे पवनाधरण आता आटू लागले आहे. वाढत्या उष्म्यामुळे आणि उपसा वाढल्याने पवना धरणातील पाणी साठा आटून तो निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळेच भविष्यात पाणीसंकट निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ( Water Storage In Pavana Dam At Half Pimpri Chinchwad City Dwellers Along With Farmers And Common Citizens Of Pavan Maval Are Worried )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील पवना धरणात आजमितीला अवघा 48.93 टक्के इतका पाणीसाठा आहे. खरेतर जुलैच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठी पुरेल, असे सांगितले जात आहे. मात्र, असले तरीही उन्हाची तीव्रता पाहता वेगाने होणारे बाष्पीभवन आणि बेसुमार होणारा पाण्याचा उपसा, यामुळे हे दिवस कमी होऊ शकतात. गेल्यावर्षी याच कालावधीत 49.03 टक्के इतका पाणीसाठा धरणात होता. याचाच अर्थ गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी पाणीसाठा यंदा धरणात आहे. त्यामुळेच सध्या जरी पाणीसाठा पुरेसा दिसत असला तरीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
यंदा पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा पवना धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा 2 हजार 777 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. तर, मागीलवर्षी 2 हजार 722 मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाअर्थ गेल्यावर्षीपेक्षा 55 मिमी अधिक पावसाची यंदा नोंद झाली आहे.
अधिक वाचा –
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक
– आमदार आश्विनी जगताप यांची चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी