‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन व मार्गदर्शक संजय येनपुरे विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभाग हे होते. ( We Mulshikar Pratishthan Felicitate Students Of SSC And HSC )
समाजामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भाग्यश्री माझिरे, निकिता मुरकुटे, सायली गरे, नम्रता मारणे, प्रीती शिंदे, अमित फाले, काव्या डोग, शेखर धुमाळ, सचिन येणपुरे यांचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. तर चैतन्य मोगल, अर्णव फाटक, प्रिया पळसकर, समीक्षा चोरगे, आर्या लायगुडे, यश शिंदे, ओम शिरसाट, सिद्धार्थ चव्हाण, आदित्य शेडगे आदी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी 100 हुन अधिक जास्त विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान करण्यात आला.
“मुली या मुलांपेक्षा जास्त कष्टाळू व फोकस असतात. सध्या मुलींचे समाजातील योगदान उल्लेखनीय आहे. करिअर करताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी, ईर्ष्या तुमच्या मनात असली पाहिजे. तसेच कष्ट करायची तयार असल्यास यशाचे अवकाशात गगनभरारी घ्याला तुम्हाला कोणीही आडवू शकत नाही. ते पुढे म्हणाले, की सातपुते आणि त्यांच्या प्रतिष्ठानचे समाजातील कार्य मोलाचे आहे. आयुष्याच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी कष्टाचे व त्यागाचे बलिदान द्यावे लागेल. स्वतःशी बोला, स्वतःसाठी वेळ काढा त्याशिवाय तुम्हाला यशाचा राजमार्ग मिळणार नाही. काही प्रश्न सोडविल्याने सुटतात तर काही प्रश्न सोडल्यानंतर सुटतात.” असे संजय येनपुरे यावेळी म्हणाले.
‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गेली 17 वर्ष त्यांच्या कलागुणांना वाव देत आहोत. प्रतिष्ठानच्या माध्यातून आम्ही 2 दशकांपासून नोकरी महोत्सव, वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’ असे मनोगत ऍड गणेश सातपुते यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात व्यक्त केले.
आदित्य सातपुते, महेश महाले, सिताराम तोंडे-पाटील, राजेंद्र उभे, निवृत्ती येवले, विकास डोख, अनंता दहीभाते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर माऊली डफळ, सुरेश साळुंखे, राम गायकवाड, जगदीश जगताप, रमेश उभे, दत्तात्रय शिंदे, सुरेश भरम आदींनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी तर आभार सिताराम तोंडे-पाटील यांनी मानले. ( We Mulshikar Pratishthan Felicitate Students Of SSC And HSC )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme