व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 2, 2023
in महाराष्ट्र
Vijay-Wadettiwar

Photo Courtesy : Twitter / Vijay Wadettiwar


महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. मात्र शेवटच्या काही दिवसांसाठी काही असेना, राज्य विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस (आय) पक्षाच्या दिल्ली हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली आहे. असे असले तरीही काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. ( Congress Party Appointed Vijay Wadettiwar As Leader of Opposition In Maharashtra Legislative Assembly )

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाने हा अंतिम निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं? हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अनेक दिवसांपासून अडकला होता. अखेर दिल्लीतून वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीत पाठवल्याची चर्चा होती. परंतू आमदारांच्या समर्थनापलीकडे विचार करुन दिल्ली हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

ह्या निर्णयासह राज्यात आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातले आहेतच, त्यांसोबत विरोधी पक्षनेते देखील विदर्भातील असणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार हे सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद एकाच समाजातून आणि प्रदेशातून देत काँग्रेस पक्षाने प्रादेशिक आणि सामाजिक समिकरणही डोळ्यांसमोर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. ( Congress Party Appointed Vijay Wadettiwar As Leader of Opposition In Maharashtra Legislative Assembly )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –

– ‘समृद्धी’चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
– ‘महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे सौभाग्य’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
– मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme

Next Post

अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.