महाराष्ट्राची समृद्धी असा उल्लेख केला जात असलेल्या नागपूर-मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबताना दिसत नाहीये. सदर रस्त्यावर अथवा बांधकाम ठिकाणी सातत्याने अपघात होऊन निष्पापांचे जीव जात आहेत. आज, मंगळवार (दि. 1 ऑगस्ट) रोजी शहापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या कामात गर्डर आणि क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 17 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झालेत. सुमारे 100 फूट उंचावरून गर्डर आणि क्रेन कोसळल्याने अपघाताची तीव्रता भयंकर होती. ( Major Accident on Nagpur Mumbai Samriddhi Highway In Shahapur Taluka of Thane District 17 Workers Died )
मंगळवारी 1.07 am वाजता प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे – ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष) दिनांक 31 जुलै रोजी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.’ असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले. ( Major Accident on Nagpur Mumbai Samriddhi Highway In Shahapur Taluka of Thane District 17 Workers Died )
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोक्का पॅटर्न! डोंगरे, परदेशी, मोतीरावे टोळ्यांवर मोक्का, एकूण 24 टोळ्यातील 226 गुन्हेगारांवर कारवाई
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार..! 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत अनेक बदल, लगेच पाहा