पुरुषोत्तम मासानिमित्त लोणावळा ( Lonavala ) येथील नारायणी धाम येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस ( Governor Ramesh Bais ) यांनी भेट दिली व श्रोत्यांशी संवाद साधला. तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस सहभागी (सोमवार, दिनांक 31 जुलै) झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. प.पू. स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते. ( Governor Ramesh Bais visits Shrimad Bhagwat Katha Week ongoing at Narayani Dham in Lonavla )
‘मानव जीवन अनमोल आहे. भागवत कथेमुळे मानवी मनाचे शुद्धीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते. सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो. श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल. श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मदा शुद्धीकरणासाठी मोठे कार्य केले आहे,’ असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
पुरुषोत्तम मासानिमित्त लोणावळा येथील नारायणी धाम येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली व श्रोत्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी कथाकार स्वामी श्री गिरीशानंद महाराज यांना वंदन केले. pic.twitter.com/7Mt0I6feNg
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 31, 2023
राज्यपाल महोदयांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची त्यांनी प्रशंसा केली आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…
– शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे
– आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कवच, जाणून घ्या सविस्तर