व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत शनिवारी (29 जुलै) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2023
in महाराष्ट्र
Agriculture-Minister-Dhananjay-Munde

Photo Courtesy : Twitter / dhananjay_munde


राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत शनिवारी (29 जुलै) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण करून त्यामार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ( State Agricultural Price Commission Will Soon said Agriculture Minister Dhananjay Munde )

सदर बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येईल. ऊर्जा, महसूल, पशु संवर्धन, सामाजिक न्याय आदी विभागांशी निगडित मागण्यांच्या संदर्भात संबंधित विभागांशी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले जातील. ऊसतोड कामगारांबरोबरच वाहतूकदार यांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामध्ये समावेश करणे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या संदर्भात विशेष सहाय्य विभागाशी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन तेही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय), बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना आदींच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.

सी-2, 50% या आधारे शेतीमालाला हमीभाव देण्यासंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे लवकरात लवकर… pic.twitter.com/aK8z1neaWo

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 29, 2023

सदर बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड तसेच संघटनेचे राजू पाटील , संदीप गिड्डे पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केले तसेच सरकारने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले. ( State Agricultural Price Commission will soon be constituted to ensure guaranteed prices for agricultural produce said Agriculture Minister Dhananjay Munde )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –

– वडगाव नगरपंचायतकडून संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी – नगराध्यक्ष मयूर ढोरे
– पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरु करा, भाजपच्या आमदाराची विधानसभेत मागणी, वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता!
– सत्तेत गेल्यावर आमदार सुनिल शेळकेंनी मावळसाठी आणला तब्बल 39 कोटींचा निधी; पाहा होणाऱ्या कामांची यादी


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कवच, जाणून घ्या सविस्तर

Next Post

प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
agriculture

प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या 'या' योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.