पिंपरी चिंचवड आयुक्तालयात संघटित गुन्हेगारीचे समोर उच्चाटन करण्यासाठी पुन्हा एकदा मोका पॅटर्नचा ( Mcoca Act ) वापर सुरु केल्याचे दिसत आहे. त्यानुसार डोंगरे, परदेशी, मोतीरावे या तीन टोळ्यांसह इतर 24 टोळ्यातील 226 अट्टल गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. ( Mcoca Act Against Dongre Pardeshi Motirave Gangs By Pimpri Chinchwad Police )
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसवण्याची मोहिम सुरूच ठेवली आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दिनांक 31 जुलै) 3 टोळ्यांतील 16 सराईत गुन्हेगारांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली गेली आहे. ह्या कारवाईसह आता मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळ्यांची संख्या 24 झाली असून एकूण 226 गुन्हेगारांवर मोकाची कारवाई झाली आहे.
डोंगरे, परदेशी आणि मोतीरावे टोळी –
पिंपरी परिसरातील यशवंत डोंगरे टोळी, तळेगाव दाभाडे परिसरातील सुधीर परदेशी टोळी आणि भोसरी परिसरातील सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ( Mcoca Act Against Dongre Pardeshi Motirave Gangs By Pimpri Chinchwad Police )
पिंपरी परिसरातील टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय 22), सुशांत उर्फ दगडी आण्णा अनिल जाधव (वय 19), आकाश रंजन कदम (वय 20), शुभम कैलास हजारे (वय 25), सुशांत उर्फ भैया आजिनाथ लष्करे (वय 22), मयूर प्रकाश परब (वय 22), कृष्णा धोंडीराम शिंदे (25, सर्व रा. पिंपरी), अजिंक्य अरुण टाकळकर (21, रा. मोशी) या टोळीवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
तळेगाव दाभाडे परिसरातील टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय 25, रा. केशवनगर, वडगाव मावळ), विवेक नंदकिशोर लाहोटी (42) आणि अन्य 2 या टोळीवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय 20, रा. आळंदी), आकाश गोविंद शर्मा (वय 22, भोसरी), राम सुनील पुजारी (वय 21, रा. मोशी), ओमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) या टोळीवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर, पद्माकर घनवट, सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, भास्कर जाधव, जितेंद्र कदम आणि अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौमेकर, सागर शेंडगे, विनोद वीर, मच्छिंद्र बांबळे, संदीप जोशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईचे शहरात सर्व स्तरातून कौतूक होत आहे. ( Mcoca Act Against Dongre Pardeshi Motirave Gangs By Pimpri Chinchwad Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…
– शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे