पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अर्थात मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्याअनुषंगाने पुणे शहरातील वाहतूकीत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येत असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. ( PM Narendra Modi Visit To Pune Many Changes In City Traffic On August 1 See Now )
पुणे शहरातील वाहतूकीत खालील प्रमाणे बदल…
दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा. ते दुपारी 3 वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा …
पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ( PM Narendra Modi Visit To Pune Many Changes In City Traffic On August 1 See Now )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘परमपथ चातुर्मास 2023 – चलो पाठशाला’ : लहान मुले समाजाचे भविष्य – गुरुदेव पियुष विजयजी महाराज
– देहू इथे सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम, 40 महिलांनी घेतला कार्यशाळा लाभ । Pune News
– विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या..! परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा सविस्तर