व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावर अग्नीतांडव! पुण्याला निघालेल्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात, 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 1, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Buldhana-Bus-Accident

Photo Courtesy : Twitter


संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झाला आहे. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यापैकी 25 जणांचा अग्नीतांडवात होरपळून मृत्यू झालाय, तर 8 जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूरहून पुण्याला येत असताना बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ( Major Accident In Buldhana 25 Dead As Bus Catches Fire on Mumbai Nagpur Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

असा घडला अपघात…

सदर ट्रॅव्हल्स बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले, तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त आणि मदत जाहीर…

बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2023

अजित पवारांकडून शोक व्यक्त…

बुलढाण्यातील घटनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणातील सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे, असे अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी आमदार सरसावले; विद्यार्थ्यांना ‘ऑफ लाईन’ पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके
– एक रुपयात पीक विमा! योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘या’ पिकांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर


Previous Post

‘मोदी सरकारचे 9 वर्षातील यश’ निबंध स्पर्धा : हचिंग्ज स्कूलमधील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे

Next Post

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मावळ पंचायत समिती सभागृहात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vasantrao-naik-birth-anniversary

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मावळ पंचायत समिती सभागृहात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.