चालू खरीप हंगाम 2023 साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ही आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ( what is e peak inspection farmers urged to record crop inspection on e-peak pahani mobile app )
खरीप हंगाम सन 2023 मध्ये आतापर्यंत 24 हजार 920 खातेदारांनी 24 हजार 628 हेक्टर आर क्षेत्रावर मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी केल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक आणि लवकर मिळते. पीक पेरणी अहवालाचा रिअल टाईम क्रॉप डाटा संकलित होण्याच्यादृष्टीने ई-पीक पाहणी महत्वाची असून माहिती संकलित करताना पारदर्शकता येते.
पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभागामुळे कृषी पत पुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनाच्या लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उर्वरीत खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीची उत्सुर्फतपणे नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
काय आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ?
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदवण्याची सोय देण्यात आलेली आहे. ( what is e peak inspection farmers urged to record crop inspection on e-peak pahani mobile app )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, वाचा काय आहेत निर्बंध