संपत्ती हा प्रत्येक कुटुंबात दबक्या आवाजात चर्चेत राहणार मुद्दा आहे. मग ते संपत्तीची खरेदी असो, विक्री असो किवा देवाण-घेवाण असो. संपत्ती हा घटक नेहमीच चर्चेत असतो. कदाचिक खुप कमी लोकांनी ही गोष्ट माहिती असेल की भारतात आजवर झालेल्या घटनादुरुस्तीत सर्वाधिक कायदेबदल हे जमिनीसंदर्भात आहे. याचे कारण भारतात जमीन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे.
जमिनीबाबत किंवा संपत्ती वाटपाबाबत अनेकांच्या मनात काही प्रश्न, शंका असतात. यातीलच एक घटक म्हणजे वडिलोपार्जित नसलेली संपत्ती आणि त्यावर असलेला मुलांचा हक्क, याच घटकाबाबत आपण या लेखात सविस्तर जाणून घेऊयात…
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्पष्टच सांगायचे झाले तर, वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नसतो. जर ती संपत्ती वडिलोपार्जित असेल तर ती मुलांना देता येते. परंतू, वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नाही. याचाच अर्थ जर मुलांना संपत्ती द्यायची नसेल किंवा मुले जर आई-वडिलांना त्रास देत असतील तर त्यांना कुठल्याही संपत्तीचा हिस्सा न देता त्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार वडीलांना आहे.
वडिलोपार्जित नसलेली संपत्ती किंवा स्वअर्जित संपत्ती
जी मालमत्ता व्यक्ती स्वत: कमावते किंवा अशी मालमत्ता जी स्वतःच्या कमावलेल्या पैशातून विकत घेतलेली असते किंवा त्या व्यक्तीला अशी मालमत्ता व्यवसायातून मिळालेली असते किंवा अशी मालमत्ता त्या व्यक्तीला भेट स्वरूपात कोणीतरी दिलेली असते. या सगळ्या मालमत्तेला स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणतात, अशा मालमत्तेवर सदर व्यक्तीचाच संपूर्ण अधिकार असतो.
हिंदू संपत्ती कायद्यात दोन भाग आहेत. त्यात एक वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी स्वअर्जित संपत्ती. आधी वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार होता. मात्र, हिंदू वारस कायदा (दुरुस्ती) 2005 कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलांइतकाच मुलींचाही अधिकार आहे. परंतू दुसरीकडे वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर यावर मुलींचा हक्क काहीसा कमकुवत आहे. वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल, घर बांधलं असेल किंवा खरेदी केलं असेल तर ही संपत्ती कुणाला द्यायची याचा पूर्ण अधिकार वडिलांना आहे.
एकंदरीत वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अथवा मुलींचा कोणताही अधिकार नाही. संपत्ती वडिलोपार्जित नसल्याने त्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार आहे, वडिलांना असतो
अधिक वाचा –
– जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर
– महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या