Dainik Maval News : आज (दि. ६ मार्च) मावळ सहीत संपूर्ण राज्यात अन् देशभरात शिवजयंती सोहळ्याचा (तिथीनुसार) उत्साह असताना मावळमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन युवा शिवभक्तांचा वाटेतच रस्ते अपघात मृत्यू झाला आहे. ह्या दुर्दैवी घटनेमुळे वडेश्वर (ता. मावळ, आंदर मावळ विभाग) गावावर शोककळा पसरली आहे.
हा अपघात रात्री (दि.६) १ वा. १५ मि. सुमारास हिरकणी रिसॉर्ट, नायगाव येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्विफ्ट कार (क्रमांक MH 14 JA 5111 ) ही लोणावळा वरून पुण्याच्या दिशेने जात होती. परंतु अचानक ही कार डिव्हायडर तोडून पुणे हून लोणावळाकडे जाणाऱ्या एर्टिगा कार (क्रमांक MH 14 MV 2294) हिला धडकून त्यामागील दुचाकी (क्रमांक MH 14 GV 5173) हिलाही स्विफ्टने धडक दिली.
ह्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवा शिवभक्त जे की शिवज्योत आणण्यासाठी किल्ले विसापूरकडे निघाले होते, ओंकार दत्तात्रय आरडे (वय 22 वर्षे) आणि दर्शन बाळू शिंदे (वय 15 वर्षे) दोघेही राहणार वडेश्वर (ता. मावळ) हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे आणण्यात आले. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर, स्विफ्ट कार मधील दोन जखमी तरूण अजय दत्तात्रय देवकर (वय 35 वर्षे) आणि अमर पडवळ (वय 32 वर्ष) दोघेही राहणार वेहेरगाव (ता. मावळ) यांच्यावर उपचार सुरू आहे, त्यांनाही आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डीवायएसपी साहेब, पोलीस निरिक्षक देशमुख, पोलिस निरिक्षक शंकर पाटील हेही पवना हॉस्पिटल येथे आले व त्यांनी अपघाताची माहिती घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे. कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शंकर पाटील यांनी ही माहिती दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर
