Dainik Maval News : राज्यात सध्या सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठाराची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथील फुलोत्सव पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे धाव घेत आहेत. परंतु, मावळ तालुक्यात देखील सध्या एक मिनी कास पठार बहरले आहे.
मुंबई पुण्यातील पर्यटकांना कास पठार सारखीच निसर्ग सौंदर्याची अनुभूती लोणावळा शहराच्या जवळ अॅम्बी व्हॅली रोडवर सह्याद्रीचा घाटमाथा असलेल्या आंबवणे परिसरात पाहायला मिळत आहे. राखीव वन असलेल्या याठिकाणी कारवी प्रकारातील स्थानिक ‘खराळा’ नावाची निळसर रंगाची फूलझाडे बहरली आहेत. यांची उंची 2 ते 4 फूट आहे. अगदी तशीच निळ्या रंगाची फूले असणारी खरी कारवी देखील याच परिसरात आहे.
तसेच परिसरात दरवर्षी बहरणारी सोनकी नावाने ओळखली जाणारी आणि भरपूर प्रमाणात आढळणारी पिवळ्या रंगाची फूल झाडे देखील बहरली आहेत. त्याशिवाय तेरडा (गंगागोवर) मिकी माउस, निसुर्डी व गौरी गणपतीला वापरतात ती शिंदलवण (चोळ्याची फुल) अशी असंख्य फुलझाडे निसर्ग वेड्यांना खेचून घेत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde
– वंदन दुर्गांना । कुटुंबासह ती पेलतेय सामाजिक जबाबदारी : संविधान संस्कारासाठी झटणाऱ्या संविधान संवादक शितलताई । Shital Yashodhara
– मोठी बातमी ! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मास्टर स्ट्रोक