Dainik Maval News : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीत भर घालणारे आणि समाजसेवेचा ध्यास घेतलेले डॉ. अशोक दाते हे टाकवे–नाणे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
उच्चशिक्षित आणि समाजाभिमुख विचारसरणी असलेले डॉ. दाते हे वैद्यकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून समाजकारणात पाऊल ठेवत आहेत. वडेश्वर, नाणे, गोवित्री या गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी लोकांमध्ये विश्वास संपादन केला आहे. विशेष म्हणजे, गावोगावच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
या गटाला अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा असली तरी, डॉ. दाते यांच्या उमेदवारीमुळे या भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी समाजकारणात उतरून विकासाचा नवा आदर्श निर्माण करावा, हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न डॉ. दाते करत आहेत.
स्थानिक पातळीवर मिळणारा प्रचंड जनसमर्थनाचा ओघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत पाया पाहता, डॉ. अशोक दाते हे टाकवे–नाणे गटाचे विजयी चेहरे ठरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मावळ तालुक्यातील सुशिक्षित, कार्यक्षम आणि सेवाभावी नेतृत्व म्हणून डॉ. अशोक दाते यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– टाकवे-नाणे गटातील प्रमुख दावेदार डॉ. अशोक दाते यांचा जनसंपर्क दौरा ; भक्तिभावाच्या वातावरणात नागरिकांचे उत्स्फूर्त स्वागत
– मावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी ; मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat
– काले-कुसगांव गटातील भाजपाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांनी घेतली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट
