व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार ! माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश । Lonavala

लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Uddhav Thackeray party suffers setback in Lonavala Many people including former corporator Shivdas Pillay join Shiv Sena

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांसह लोणावळा उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात ( एकनाथ शिंदे यांच्या ) जाहीर प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवासेनेचे विशाल हुलावळे,दत्ता केदारी,नवनाथ हरपुडे उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी खासदार बारणे यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच मूळ शिवसेना आहे. त्यामुळे राज्यभरातील ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

शिवसेना लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक ताकदीने लढविणार आहे. लवकरच उमेदवारांबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तळेगाव दाभाडे शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपसोबत लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार


Previous Post

वाघेश्वर गावातून तीर्थक्षेत्र आळंदी येथे निघालेल्या पालखी व पायी दिंडीचे ज्ञानेश्वर दळवी यांनी केले उत्साहात स्वागत

Next Post

मावळ तालुक्यातील टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटाला मिळणार उच्चशिक्षित डॉक्टरांचे नेतृत्व ? Dr Ashok Date

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Will the Takve-Nane Zilla Parishad group in Maval taluka get leadership of highly educated Dr Ashok Date

मावळ तालुक्यातील टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटाला मिळणार उच्चशिक्षित डॉक्टरांचे नेतृत्व ? Dr Ashok Date

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.