Dainik Maval News : श्री विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदुरी यांच्या वतीने दसरा-दिवाळी निमित्त “महिला सन्मान ठेव योजना २०२५” अंतर्गत एक भव्य आणि उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शुक्रवारी, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी संस्थेच्या कार्यालयात या योजनेअंतर्गत मुदत ठेव केलेल्या महिलांना आकर्षक पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा शेवकर व कोमल शिंदे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा ढोरे व ॲड. नेहा शिंदे यांनी केले. महिलांसाठी खास अल्पोपहार व चहापान आयोजित करून कार्यक्रमाचा समारोप आनंदी वातावरणात करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर, ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ शेवकर, साईनाथ बाणेकर, चेअरमन स्वप्निल सूर्यकांत भागवत, उपाध्यक्ष आदित्य गुलाबराव शेवकर, सचिव राधिका भगवान शेवकर, कोषाध्यक्ष प्रविण विष्णू दगडे, तसेच त्यागराज शंकरराव शेवकर, दत्तात्रय तुकाराम शेवकर, निलेश मच्छिंद्र शेवकर, रामदास शंकर भांड, किशोर दशरथ ढोरे आणि सोमनाथ पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत, या योजनेला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल महिलांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. विघ्नहर पतसंस्थेचा हा उपक्रम केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित न राहता समाजातील महिलांच्या सन्मान, प्रोत्साहन आणि आर्थिक सबलीकरणाचा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा