Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी मंगळवारी (ता.१८) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सदर महामार्गाच्या उड्डाणपुलासह उन्नतीकरण करण्याच्या कामाला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यासंदर्भात निवेदन दिले.
- एकूण ५३ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी हा मुंबई-पुणे आणि पुणे संभाजीनगर या महामार्गासह औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता आहे. तसेच पुणे शहराला बाह्यवळण म्हणून उपयुक्त ठरणारा रस्ता आहे. सदर महामार्ग राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआईडीसी) मार्फत विकसित केला जाणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव एमएसआईडीसी मार्फत राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तरी सदर प्रस्तावाचा आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत समावेश करुन त्यास मंजुरी द्यावी आणि सदर रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे असे निवेदनात म्हटले आहे.
खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, कृती समितीचे सचिव अमित प्रभावळकर, उपाध्यक्ष दिलीप डोळस, प्रमोद देशक, गणेश बोरुडे आदी पदाधिकाऱ्यांसह राजगुरुनगर शिवसेना शहरप्रमुख संतोष राक्षे, सुधाकर शेळके हे याप्रसंगी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News