Dainik Maval News : गेली 25 वर्षे लालफितीत अडकून पडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या चारपदरी रस्त्याचे कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच 2025-26 च्या अर्थसंकल्पात 6 हजार 499 कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेली. त्यामुळे 25 वर्षे लालफितीत अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम आता मार्गी लागेल, असे दिसत आहे.
तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चारपदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर हा एकूण 53 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (मुंबई-पुणे महामार्गाला) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 पुणे-संभाजीनगर महामार्गाशी जोडणार आहे. यामुळे पुण्याजवळील वाहतूक कोंडी कमी होईल.
या प्रकल्पामध्ये सध्याच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरी उन्नत महामार्गात रूपांतर करणे आणि तळेगाव ते चाकणदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,499 कोटी खर्च अपेक्षित असून, तो टोलवसुली किंवा कर्जाद्वारे उभारला जाणार आहे.
‘एमएसआयडीसी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता जमीन अधिग्रहण आणि निविदा प्रक्रियेला वेग येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा