जागतिक दिव्यांग दिन निमित्त ( World Disability Day ) पंचायत समिती ( Panchayat Samiti ) वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 3 डिसेंबर ( 3 December ) हा दिवस दरवर्षी जागतिक स्तरावर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने शनिवारी पंचायत समिती वडगाव मावळ येथे दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे चेक अदा करण्यात आले.
समाजाच्या आणि विकासाच्या सर्व क्षेत्रात अपंग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे आहे, यादृष्टीने दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. ( World Disability Day 3 December Disability Fund Check Distribution To 95 Beneficiaries )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंचायत समिती मावळ मार्फत प्रणय पाटील (सहाय्यक गटविकास अधिकारी – पं. स. मावळ) व्हि. आर. भोईर (सहाय्यक प्रशासन अधिकारी – पं. स. मावळ) बाजीराव ढमाले, साजन येवले, हेमंत घोलप, रामदास कोड्रे (समाज कल्याण विभाग) आदींच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील एकूण 95 दिव्यांग बांधवांना निधी चेकचे हस्तांतरण करण्यात आले. रुपये अडीच हजार रकमेची ही राशी दिव्यांग बांधवांसाठी निश्चित मतदगार ठरेल.
बाजीराव ढमाले यांनी यावेळी दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाणीव करुन दिली. तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी प्रशासनामार्फत गावोगावी मोहिम राबवण्यात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, प्रणय पाटील यांनी पंचायत समिती प्रशासनाकडून तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्यांचे लाभ घ्यावा, गाव पातळीवर काही योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, नक्की वाचा । Divyang Melava Vadgaon Maval
– ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप