दरवर्षी दिनांक 28 मे हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे जागतिक स्तरावर चांगल्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाचे (MHM) महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वार्षिक जागरूकता दिवस आहे. मावळ तालुक्यातील खांडी या गावामध्ये होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे व गेस्टम्प कंपनी टाकवे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन दिनानिमित्त महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून श्रीमती सुवर्णा खराडे, श्रीमती प्रिया फरांदे, डॉ अश्विनी कापसे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे समुदाय विकास प्रकल्प समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी केले. या सत्रामध्ये स्वतःच्या आरोग्याची व मासिक पाळी दरम्यानची काळजी कशी घ्यावी, हे प्रशिक्षकांनी सांगितले. ( world menstrual hygiene day celebrate at khandi village in andar maval )
ग्रामीण भागामध्ये या विषया संदर्भात वेगवेगळे गैरसमज आहेत. याविषयी प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. दरम्यान महिलांनी विविध प्रश्न विचारले. या कार्यक्रमात 85 महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिलांना व मुलींना श्रीमती मयुरी ढवळे यांसकडून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन समन्व्यक ऋषिकेश डिंबळे, डॉ अश्विनी कापसे व संदिप कोंडभर, आशाताई वाझे यांचे आभार खांडी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवेश्वर यांनी मानले.
अधिक वाचा –
– निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; निगडे, कल्हाटसह पाच गावातील नागरिकांना दिलासा
– भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध