Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘एक घास पक्ष्यांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. नगरपरिषद हद्दीमध्ये माझी वसुंधरा अभियान 5.0 यांच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.
- वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, शेतीवरील औषध फवारणी, पाण्याचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा सर्व पर्यावरण हानी करणाऱ्या गोष्टींमुळे निसर्गातील पशू पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. त्यात जागतिक तापमानवाढ अर्थात वाढत्या उन्हामुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. म्हणूनच चिमणी संवधर्नासाठी हा उपक्रम नगरपरिषदेकडून स्टेशन तलावातील बेटावर चिमण्यांना धान्य ठेवून राबवण्यात आला.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, रोटरीयन संदीप पानसरे, विवेक भगत, कर व प्रशासकीय अधिकारी मोनिका झरेकर, स्थापत्य अभियंता गौरी चव्हाण, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, लिपिक प्रवीण माने, गौरव तापकीर, सौरभ पोटवडे, सनी ननावरे, प्रफुल गलीयत आदी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे विवेक भगत यांनी माणूस हा बुद्धिमान प्राणी असून “सर्विस टू मॅन सर्विस टू गॉड” ऐवजी “सर्विस टू इन्व्हरमेंट सर्व्हिस टू गॉड” या स्लोगनाच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री