Dainik Maval News : लाल मातीतील आखाड्यासह राजकारणाच्या आखाड्यातही विरोधकांना चितपट करणारे काँग्रेस (आय) पक्षाचे जुणे जाणते नेते, पैलवान चंद्रकांत सातकर यांचे आज, सोमवार (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी दुःखद निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. मावळच्या सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
सोमवारी (दि. 11) दुपारी त्यांचे निधन झाले असून मंगळवारी (दि. 12 ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमी, खापरे ओढा, कान्हे (ता. मावळ ) या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून कळविण्यात आले आहे.
पैलवान चंद्रकांत आप्पासाहेब सातकर हे मावळच्या राजकारणातील एक अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यांनी मावळ विधानसभा निवडणूक देखील लढविली होती. तसेच काँग्रेस पक्षाचे ते जिल्हास्तरीय नेतृत्व होते. सामाजिक, राजकीय सह क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे. स्वतः पैलवान असल्याने त्यांनी कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान दिले.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते खचले होते. परंतु, सामाजिक कार्यामुळे जनतेते मिसळत राहिले. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत देखील त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली होती. तालुक्याच्या बदललेल्या राजकारणाला त्यांनी जवळून पाहिले होते. तसेच तालुक्याच्या विकासाचे आणि परिवर्तनाचे ते साक्षीदार राहिले होते. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर