इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने झोनल इव्हेंटचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. एल. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये केले होते. त्यात कुस्ती आणि वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कोकण विभागातील डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. ( Wrestling and Weightlifting Zonal Event at BL Polytechnic College )
झोनल इव्हेंटच्या माध्यमातून आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये सार्थक देशमुख, केशवराज धाटे, सुयोग कोळी, मनीष पाटील, प्रेम ठाकरे, यश म्हात्रे, श्रेयस कदम यांनी तर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विलास देशमुख, सुयोग कोळी, हरिश्चंद्र पोळेकर, संतोष सरदार, आझम खान, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विविध वजनी गटात यश संपादन केले. या स्पर्धांचे उद्घाटन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, सदस्य जितेश ठक्कर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांच्या माध्यमातून झाले तर बक्षीस समारंभ खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, रायगड भूषण जगदीश मरागजे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बी. एल. पॉलिटेक्निक कॉलेजला या स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान मिळाल्याबद्दल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आयोजकांचे आभार मानताना सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते अशा आशयाचे प्रतिपादन करताना खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. ( Wrestling and Weightlifting Zonal Event at BL Polytechnic College )
कोकण विभागीय स्तरावर या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करताना बी एल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, कर्मचारी तसेच खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे राजू कुंभार आणि वेट लिफ्टिंग स्पर्धेतील तंत्रज्ञ विनायक पाटील यांनी आपले योगदान दिले.
अधिक वाचा –
– Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक
– व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड