Dainik Maval News : मिनी बस चालकाने भरधाव वेगात बस चालवून एका तरुणीला धडक दिली, यात तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.६) दुपारी ४.२० वाजता मिनिटांनी तळवडे चौक येथील गावकमानीच्या समोर आळंदी – देहु कडे येणाऱ्या रोडवर हा अपघात घडला होता.
याप्रकरणी दत्तात्रय महादेव घोडके (वय ५२, रा. इंदीरानगर, ता. पंढरपुर जि. सोलापुर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा हारकोपोलो कंपनीची मिनी बस (क्रमांक एमएच १४ एलएल ७७३३) या बसवरील अज्ञात चालकाविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(०), १२५(ड), १०५ मो.वा. कायदा १९८८ चे कलम १८३, १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी माधुरी दत्तात्रय घोडके (वय २२ वर्ष) ही तळवडे चौकातील गावकमानीच्या समोरून रस्त्याने पायी जात असताना टाटा हारकोपोलो कंपनीची मिनी बस (क्रमांक एमएच १४ एलएल ७७३३) वरील चालकाने बस अत्यंत बेदरकारपणे, धोकादायकरित्या, अतिवेगाने, निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीची मुलीस जोरात धडक दिली.
अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर मिनी बस चालकीने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावर मिनी बस सोडून तिथून पळ काढला. यात तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस वाहनचालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोउपनि खणसे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha