Dainik Maval News : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.२) रात्री गहुंजे (maval crime) येथे करण्यात आली. अजय लक्ष्मण म्हेत्रे (वय २६, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस अमलदार राजकुमार ईघारे यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या काठावर गहुंजे येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजय म्हेत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News