लोणावळा शहर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळाच्या सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या एका तरुण-तरुणीला धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत सलमान उस्मान खान (वय 19, रा. टेबल चाळ, जी वार्ड लोणावळा) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याची मैत्रिण रविवारी रात्री लोणावळा पुलाच्या पुढे फिरायला गेले असता, त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला. सलमान खान च्या गळ्याला चाकू लावून त्याच्या जवळील आयफोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची चैन, चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी सलमान याच्या गळ्याला आरोपींनी चाकू लावून त्यांना लुटत असताना झालेल्या झटापटीत तो जखमी झाला. ( Young Man Named Salman Khan Was Robbed In Lonavala City Area Case Registered In City Police )
सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात भादवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
–अपघात ब्रेकिंग! खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू