Dainik Maval News : मुंबई-पुणे महामार्गावर डंपर अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रीधर यशवंत पाटील (वय ३२, रा. लिंब, ता. तासगाव, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. तर, पवन गुलाबराव मांजरे (वय २३, रा. बोरगाव काकडे, बुलढाणा) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी बाळकृष्ण सुधाकर मुंडे (वय २५, रा. मांगवडगाव, ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर पाटील हे वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होते. बुधवारी (ता. ६) सकाळी ते आपल्या दुचाकीवर (एमएच १२ – केके ०४६०) सहकाऱ्यांसमवेत लोणावळ्याजवळील कोराईगड येथे पर्यटनासाठी निघाले होते. याचदरम्यान लोणावळ्यात वलवण येथे द्रुतगती मार्गावरील पुलाखाली पुण्याकडे येणाऱ्या डंपरचा (एमएच ४६ बीयू ४७७६) हौदा अचानक उचलला गेल्याने पुलाच्या खांबाला धडकत डंपर उजव्या बाजूस श्रीधर यांच्या दुचाकीवर उलटला.
या घटनेत श्रीधर व पवन हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना प्रथम कार्ला येथे व नंतर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, श्रीधर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी डंपरचालक महादेव रोहिदास शितोळे (वय ३१, रा. माजगाव, ता. खालापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शकील शेख करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या