Dainik Maval News : लहान मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले प्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हा निर्णय दिला. विशाल मधुकर लाखे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी विशाल मधुकर लाखे हा पीडितेच्या घराच्या परिसरात राहणारा होता. ओळखीचा फायदा घेऊन जवळीक साधून तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन व तिला फूस लावून लग्न करायचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर वारवारंवार बलात्कार करुन गर्भवती केले. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
सरकारतर्फे खटल्याचे कामकाज विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगले यांनी पाहिले. त्यांनी न्यायालयात फिर्यादी, पिडीत मुलगी व इतर 8 साक्षीदार यांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले. खटला शाबीत करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. न्यायालयाने अभियोग पक्षाचे साक्षीपुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक के. आर. वालकोळी यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पैरवी म्हणून कोर्ट अमंलदार आरती अर्जुन जाधव यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयामध्ये पाठपुरावा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha