Dainik Maval News : बेकायदेशीररित्या कोयता बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी करण्यात आली.
रविंद्र सुरज सातोळे (वय 20, रा. गांधीनगर पाण्याचे टाकीमागे, देहूरोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार नीलेश किसन जाधव यांनी शुक्रवारी (दि. 21) याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी रवींद्र सातोळे याच्या जवळून बेकायदेशीररित्या बाळगलेला कोयता हस्तगत करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा