तळेगाव दाभाडे शहराच्या कचरा डेपो परिसरात एका झाडाला गळफास घेऊन तरtणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी (दि. 23 मे) रोजी सकाळच्या सुमारास घोरावाडी परिसरात हा प्रकार समोर आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सरगम कैलास यादव (वय 25, स. रा. सोमाटणे, ता मावळ. मूळ रा. बिहार) असे आत्म’हत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मुळचा बिहार येथील असून तो हल्ली सोमाटणे येथे वास्तव्यास होता. तो त्याच्या घर मालकाकडे मिळेल ते काम करत असे. ( youth committed suicide by hanging himself in Talegaon Dabhade )
त्याने तळेगाव दाभाडे शहराच्या घोरावाडी येथील कचरा डेपो परिसरात एका झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सददर तरूणाने आत्महत्या का केली, ते समजू शकलेले नाही. तळेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News
– पवना धरणात 27 टक्के पाणीसाठा ! पावसाची चाहूल लागल्याने काळजीचं कारण नाही, पण… । Pavana Dam
– बारावी निकाल : लोणावळा केंद्रात यंदा उत्तीर्णांचा टक्का वाढला, तीन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, वाचा सविस्तर । HSC Result 2024