Dainik Maval News : मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष यांनी पक्षाचा ‘हात’ सोडला असून शिवसेना पक्षाचा भगवा खांद्यावर घेतला आहे. मावळ तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश वाघोले यांनी शिवसेना पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताशेठ केदारी, शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, शीलाताई भोंडवे,शिवसेना महिला शहर संघटिका शुभांगी काळंगे उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे एक धडाडीने नेतृत्व म्हणून राजेश वाघोले यांच्याकडे पाहिले जायचे. काँग्रेसच्या युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष पद मिळाल्यानंतर पक्षात युवकांचे संघटन उभे करण्यासाठी त्यांनी चांगले काम केले होते. तसेच, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षादेशाप्रमाणे चांगले काम केले होते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne