पवना नदीच्या ( Pavana River ) पुलावर उभं राहून सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा नदीत कोसळल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी शिरगाव साळुंब्रे जोडणाऱ्या पवना नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. सेल्फी कढण्याच्या नादात हा तरुण नदीत कोसळला होता. इकतार अहमद (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून सदर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. ( Youth Death Due To Fell Into Pavana River While Taking Selfie )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, अध्यक्ष गणेश निसाळ, आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यू टीम, विनय सावंत, सत्यम सावंत, निनाद काकडे, शुभम काकडे, भास्कर माळी, तुषार सातकर, ओमकार भेगडे, बाबु चव्हाण, अनिश गराडे राणी एँब्यूलस, अजय मुर्हे, शिरगाव पोलीस स्टेशन परंदवाडी पोलीस, पीएसआय कांबळे, पोलीस नाईक महादेव कवडे, पोलीस पाटील ॲड. सारीकाताई आगळे गहुंजे पोलीस पाटील, आरती अतुल बंडलकर साळुंब्रे पोलीस पाटील, हिरामन आगळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
पाथरगाव इथे आदिवासी बांधवाच्या घरात घुसलेल्या 14 फुटी अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान, पाहा व्हिडिओ
कुख्यात गुंड गजा मारणे जेरबंद, ‘या’ ठिकाणाहून पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या I Pune Crime