Dainik Maval News : एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 2 जून) सकाळी अकरा वाजता वडगाव रेल्वे स्टेशनजवळ घडली. गणेश चंद्रकांत पराठे (वय 30 रा. आहिरवडे फाटा, कृष्णा टेम्पल, साते, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लोहमार्ग पोलीस सतीश खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेस रेल्वेची धडक बसून गणेश पराठे हा गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाला.
घटनास्थळी आरपीएफ तळेगाव दाभाडे सुनील चांदणे, लोहमार्ग पोलीस सतीश खराडे व केकेआर रुग्णवाहिका चालक पिंटू मानकर यांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला. मृतदेह नातेवाईकांची ताब्यात दिला. पुढील तपास तळेगाव दाभाडे लोहमार्ग पोलीस करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश