कामशेत येथे इंद्रायणी नदी पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सोमवार, दि. 13 मे रोजी घडली. आपदा मित्रांनी सदर तरूणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. करण चोपडे (वय 19, रा. नायगाव ता. मावळ) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, करण हा इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ( Youth drowned in Indrayani river at Kamshet )
त्यानंतर, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना पाचारण करून या तीनही संस्थांमधील स्वयंसेवकांनी करण याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघात 52.90 टक्के तर मावळ विधानसभेत 53.02 टक्के मतदान, ‘या’ ठिकाणी झाले सर्वाधिक मतदान । Maval Lok Sabha
– कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण
– मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha