तळेगाव दाभाडे : गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. रविवारी (दिनांक 18 जून) रोजी दुपारच्या सुमारास शंकरवाडी (तळेगाव दाभाडे) इथे ही कारवाई करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मनोज शंकरलाल प्रजापती (वय 27, रा. कळंबोली, पनवेल. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( youth who came to sell ganja was arrested red handed in talegaon dabhade city maval )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरवाडी येथे एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मनोज प्रजापती याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 29 किलो 152 ग्राम वजनाचा गांजा आणि 10 हजारांचा मोबाईल फोन असा एकूण सात लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मनोज प्रजापती याने हा गांजा ओडीसा येथील शिवा सिमलीगोडा या व्यक्तीकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन
– अंगावर काटा आणणारी बातमी..! आढले गावातील एकाच घरात सापडली घोणस सापाची तब्बल 20 पिल्ले