मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नियोजनात्मक विकास आराखडा आढावा बैठक वडगाव मावळ येथे संपन्न झाली. सदर बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या समस्या व सुचना जाणून घेण्यात आल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“अनेक शाळेतील वर्ग खोल्यांची पुनर्बांधणी, क्रीडांगण, स्वतंत्र स्वच्छतागृह, संरक्षक भिंत संगणकीय ज्ञान अशा पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असणार असून दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षणासह शाळांच्या भौतिक विकासावर भर देणार आहे. तसेच शिक्षकांनी सुचविलेल्या गरजु विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मानस आहे” असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण गुणवत्तापूर्ण होत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत मावळातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा कल वाढला पाहिजे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. यावेळी आमदार सुनिल शेळकेंसमवेत सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे खजिनदार नंदकुमार शेलार, पंचायत समिती माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नारायणराव ठाकर, चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे, ज्ञानेश्वर निंबळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– खासदार फंडातून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 10 लाखांचा निधी – अनंता कुडे
– वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन