Dainik Maval News : मावळमधील निगडे गावातील साकव पूल, समाजमंदिर, विद्युत पोल, रस्ते, व्यायाम शाळेचे साहित्य असे विविध प्रश्न आमदार सुनिल शेळके यांनी मार्गी लावले आहेत. निगडे गावासाठी उपलब्ध 1 कोटी 65 लक्ष निधीतून साकव पुल बांधणे, समाज मंदिरासमोर सभागृह बांधणे, विद्युत पोल बसविणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, व्यायाम शाळा साहित्य व अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे आदी विकासकामे केली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी (दि.22) आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला माता-भगिनी मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होत्या. भूमिपूजन समारंभास आमदार शेळकेंसह भगवान भांगरे, गोविंद अंभोरे, हभप रोहिदास महाराज धनवे, सरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच भगवान ठाकर;
चांगदेव वायकर, नारायणराव ठाकर, दत्ताभाऊ वायकर, दिगंबर आगिवले, मोहन घोलप, शिवाजी करवंदे, शहाजी कडू, हनुमंत हांडे, गणेश भांगरे, चंद्रकांत कर्पे, समीर कदम, सोपान ठाकर, रविंद्र पवार, सुवर्णा घोलप, उमाताई शेळके, सविता भांगरे तसेच आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य आणि माता-भगिनी उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke