मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा संघटनांचा आवाज आणखी बुलंद केला आहे. राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जरांगेंनी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. त्यानंतर सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. ताे 14 ऑक्टोबरला संपत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंची सभा होणार आहे. सध्या त्या सभेची तब्बल शंभर ते दीडशे एकरांवर जंगी तयारी करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेसाठी सकल मराठा समाज मावळ तालुका यांच्या वतीने 1,00,000 (1 लाख ) मिनरल वाटर बॉटल पाणी पाठवण्यात आले आहे.
ह्या पाण्यासह मराठा आरक्षण आंदोलनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मावळचे बळ मिळाले आहे. मावळातील सकल मराठा समाजाने आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला आहे. शनिवारी जरांगे पाटील यांची जालना येथील अंतरवाली सराटी येथे विराट सभा होणार आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येथे सहभागी होणार आहे. या सभेस पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मावळातील मराठा बांधवांच्या वतीने लोकसहभागातून पिण्याच्या एक लाख पाण्याच्या बाटल्या अंतरवाली सराटी येथे रवाना केल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम
– अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! – मावळ राष्ट्रवादी काँग्रेस