व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अकरा मावळ्यांनी बारा तासांत सर केले सात किल्ले ; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद । Maval News

बारा मावळातील भोर व मावळ येथील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर चढाई करत एक अनोखा विक्रम केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 9, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
11 trekkers from Maval scaled seven forts in twelve hours

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बारा मावळातील भोर व मावळ येथील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर चढाई करत एक अनोखा विक्रम केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. सदर चढाईमध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील गड किल्ले हे शिवरायांच्या स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे. शेकडो वर्ष होऊन गेले तरी हे गड किल्ले आजदेखील शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आणि या गडकिल्ल्यांवरती चढाई करण्याची प्रेरणा येथील भटक्यांना देत असतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकिल्ल्यांवरती भेट देणे हे प्रत्येक शिवप्रेमीचे स्वप्न असते. अशाच काही ध्येयवेड्या गडकोटप्रेमी युवकांनी एकत्र येत मावळातील तब्बल सात किल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई करून बारा तासांमध्ये हा विक्रम 18 जानेवारी रोजी केला होता.

  • ग्रुपने आपली सुरुवात सकाळी पाच वाजता राजमाची या किल्ल्याच्या मनरंजन या बालेकिल्ल्यापासून केली. यानंतर श्रीवर्धन हा किल्ला सर केला. यानंतर हा गट राजमाचीपासून खासगी वाहणारे प्रवास करून लोहगड, विसापूरकडे रवाना झाला. या जोडगोळीतील पहिला विसापूर किल्ला या गटाने सर केला. यानंतर लोहगडावर आपली पावले ठेवली. लगेचच गड उतार होऊन मंडळी तिकोना गडाकडे रवाना झाली.

तिकोना गड तासाभरात सर करून मावळे तुंग गडाकडे रवाना झाले. आणि तुंग गड तासाभरामध्येच चढाई करून उतरलेदेखील यानंतर आता वेळ होती कोराईगड पार करणे आणि सहा गड पार करणे आणि ते पार करून सातवा कोराईगड चढाई करणे आणि उतरणे हे एक आव्हानच होते, पण या गटाने हे आव्हानदेखील पार करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

अकरा मावळे
सुनील चंद्रकांत शेडगे, शेखर शांताराम नाणेकर, रुपेश हरिभाऊ कुंभार, राजेंद्र महादेव चौगुले, लतिफ बापू पटेल, मनोज लक्ष्मण जगताप, रामेश्वर खांडेभराड, बबन कदम, राजेंद्र शिंदे, वसंत विठ्ठल कामथे, अनंता भागवत यांनी हे किल्ले बारा तासात सर केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

महागाव येथे आढळला बारा फुटी अजगर ; सर्पमित्र रमेश कुंभार यांच्यामुळे सापाला जीवदान । Pavan Maval

Next Post

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
devendra fadanvis eknath shinde ajit pawar

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.