Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील वर्षभरात पोलिसांनी तब्बल 12 कोटी 7 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात (2024) दोन लाख 26 हजार 265 कारवाया केल्या. यामध्ये सिग्नल जम्पिंग, फॅन्सी नंबरप्लेट, मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, विनापरवाना वाहन चालवणे, अवजड वाहने आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा समावेश आहे.
मावळमध्ये अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई :
मावळ तालुक्यात वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
विनाहेल्मेट प्रकरणी साडेतीन कोटींचा दंड :
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गतवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 47,501 वाहनचालकांवर विनाहेल्मेट प्रकरणी कारवाई केली. यात 3 कोटी 59 लाख 23 हजार रुपयांचा दंड आकारला.
नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई व्हावी :
तळेगाव स्टेशन परिसरात नो-पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे