पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबार घटनेला आज (9 ऑगस्ट) 12 वर्षे पूर्ण झाले. या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या 12 व्या स्मृती दिनानिमित्त शिवप्रसाद मंगल कार्यालय (पवनानगर) इथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून गोळीबारात मृत पावलेले शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे, मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी पवनामाईच्या रक्षणार्थ 9 ऑगस्ट 2011 रोजी पवन मावळ भागातील सामान्य शेतकरी बांधवांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन हाताळताना पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे या शेतकऱ्यांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता. तर अन्य काही शेतकरी जखमी झाले होते. या शहीद शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेते आणि तालुक्यातील नागरिकांकडून शहीद स्मारकाच्या इथे अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवप्रसाद मंगल कार्यालय इथे सामूहिक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. ( 12 years of Maval shooting incident Paying homage to martyred farmers in Pavananagar )
“पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्दच झाला पाहिजे. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच ठेवणार” – रविंद्र भेगडे (तालुकाध्यक्ष – मावळ भाजपा)
“पवना ही मावळच्या शेतकऱ्यांची आस्था आणि अस्मिता आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून स्वतःचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय कायम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” – बाळा भेगडे (माजी आमदार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष)
यावेळी ज्येष्ठ नेते शंकर शेलार, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दादाजी जांभूळकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, पुणे जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष ॲड. फडके साहेब, माजी पं.स. सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी पं.स. सभापती एकनाथ टिळे साहेब, प्रशांत ढोरे, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोपानराव म्हाळसकर, माजी पं.स. सभापती गुलाबराव म्हळसकर, शांताराम कदम, अमोल शेटे, मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, आर.पी.आय. मावळ तालुका अध्यक्ष नारायण भालेराव;
माजी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, सुमित्रा जाधव, रामदास गाडे, चंद्रचूड महाराज, युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, गणेश ठाकर, संदीप भुतडा, युवा नेते एकनाथ पोटफोडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, महागाव चांदखेड जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, महागाव गणाचे अध्यक्ष नारायण बोडके, बाळासाहेब जाधव, किरण राक्षे, वसंत म्हसकर, कामशेत शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष प्रवीण शिंदे, बंटी भेगडे यांच्यासह पवन मावळ भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( 12 years of Maval shooting incident Paying homage to martyred farmers in Pavananagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ठिकाणी जाऊन शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेस नेत्यांकडून शहीद शेतकऱ्यांना वंदन । Photo
– पुणे जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात घेतली जाणार पंचप्रण शपथ, काय आहे अभियान? जाणून घ्या
– लोणावळ्यात उतरले म्हणून टोलची रक्कम वाढली कशी? मराठी अभिनेत्रीने केली मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलची ‘पोलखोल’