पुणे जिल्ह्यात लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील विविध विभागामार्फत आतापर्यंत 1 हजार 200 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. पावसाची अनियमितता आणि त्यातील खंड यामुळे काही तालुक्यात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषांगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी व अन्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ( 1200 forest dams completed through public participation in entire Pune district )
या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्र, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात 10 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, जनावरांना, भाजीपाला आणि कडधान्य यासारख्या पिकांसाठी होतो. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरून आणि त्यांची तोंडे शिवून बंधाऱ्यासाठी वापरता येतात. बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा अधिक नसावी. नागरिक आणि विविध संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी केले आहे. ( 1200 forest dams completed through public participation in entire Pune district )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात आता 24 तास असणार उजेड; रात्रीच्या अंधारातही गावकऱ्यांच्या पायवाटा उजाळणार
– वडगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद; गणेश भक्तांनी जिंकली 90 हजार रुपयांची रोख बक्षिसे, बघा यादी