मावळ तालुक्यातील वडगाव शहरातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. वडगाव मावळ शहरातील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीत एका 13 वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सदर कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अभिनव जगदीश कडभाने (वय 13, रा. कृष्णा पार्क सोसायटी, संभाजीनगर, वडगाव मावळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अभिनव हा सकाळच्या सुमारास चिमण्या पाहण्यासाठी गेला असता पावसामुळे झालेल्या निसरड्या जागेत त्याचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन खाली पडला. चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ( 13 year old boy died after falling from fourth floor of building Incident at Vadgaon Maval )
अभिनव हा रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. बुधवारी (दिनांक 5 जुलै) रोजी सकाळी तो सोसायटीच्या गच्चीवर चिमण्या पाहण्यासाठी आणि त्यांना धान्य टाकण्यासाठी गेला असता हा अपघात घडला. त्याला उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने शाळेत आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा –
– स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री शिवनेरी बसचा अपघात! 7 जण जखमी, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश