गहुंजे गाव (ता. मावळ) येथे एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि. 11 मे) रोजी घडली. निखिल यादव ( वय 16) असे बुडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो लष्करी अधिकाऱ्यांचा मुलगा होता, अशी माहिती मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गहुंजे गावचे पोलिस पाटील आगळे यांनी वन्यजीव रक्षक आणि पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर संबंधित टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या मुलाला पाण्याबाहेर काढले. ( 16 year old boy drowned in Gahunje village Maval )
वन्य जीवरक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ यांचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, शुभम काकडे, गणेश गायकवाड, संतोष दहिभाते, विनय सावंत आणि प्रतिक कुंभार यांनी या सर्च व रेस्कू ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
अधिक वाचा –
– ‘ती जबाबदारी माझी..’ मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !
– तळेगावातील ‘त्या’ रस्ते खोदकामाची चौकशी व्हावी; आमदार सुनिल शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी । Talegaon Dabhade
– एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर । MPSC Result 2024