व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील इयत्ता दहावीची 2004-05 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in लोकल, ग्रामीण
School Alumni Gathering

Photo Courtesy : Team Dainik Maval


ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शिक्षणाच्या जोरावर मोठमोठ्या पदावर विराजमान झालो, ती शाळा कधी विसरायची नसते. जर पुन्हा शाळेत जायची वेळ आली किंवा योग आला तर जायचं असतं, आणि ह्याच विचाराने कार्ला येथील एकविरा विद्यालयात 20 वर्षांपूर्वी सोबत शिकलेले सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. तब्बल 20 वर्षांनी त्यांची शाळा पुन्हा भरली आणि आठवणींची घंटा जोरजोरात वाजू लागली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील इयत्ता दहावीची 2004-05 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षक आणि वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्वाचे आहेत, आणि जिवनाला कलाटणी देणारे आहेत हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ( Ekvira Vidyalaya Karla School Alumni Gathering )

समारंभासाठी शाळेचे तत्कालीन प्राचार्य संजय वंजारे, इयत्ता दहावीला अध्यापन करणारे माजी अध्यापक रामभाऊ पोटे, दशरथ ढमढेरे, विलास येवले, छाया मोरे, सुनिल बोरुडे, शहादेव जाधव, काकासाहेब भोरे, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, मधुकर गुरव, बाबाजी हुलावळे या सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शालेय कार्यकालात मिळणाऱ्या दुकानातील खाद्य पदार्थ बोरकूट, चिंच, सागर मलाई यांची पद्धत शीर मांडणी केली होती. या जुन्या आठवणीने विद्यार्थी भावूक झालेले दिसले.

या एक दिवसीय शाळेची सुरुवात शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत म्हणत झाली. राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर बॅचमधील ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना देवाज्ञा झाले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण उत्साही वातावरणात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख “मी सध्या कोण” या सदरातून करून दिली. सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेविषयीच्या आठवणी जागृत केल्या. माजी विद्यार्थ्यांकडून शालेय उपयोगी शाळेला भेट वस्तू देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायखे, सुवर्णा भानुसघरे, कैलास हुलावळे, राखी शेलार यांनी केले. त्यानंतर या एक दिवसीय शाळेत मधली सुट्टी पण देण्यात आली. या सुट्टीत सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी डब्बा खाण्याचा आस्वाद घेतला. यानंतर माझ्या आठवणी मधील एक एक तास वर्गात घेण्यात आला. नंतर संगीत खुर्ची घेत एक दिवसीय शाळेची सांगता वृक्षारोपण करून झाली. स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी 2004-05 बॕचच्या सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी विशेष प्रयत्न केले.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– ‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका
– ‘ती जबाबदारी माझी..’ मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !
– तळेगावातील ‘त्या’ रस्ते खोदकामाची चौकशी व्हावी; आमदार सुनिल शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News

Next Post

अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Wrestlers Kshitija Maragaje from Raigad

अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.