व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वारं फिरलं… आणि एकतर्फी वाटणारी मावळ लोकसभेची निवडणूक अखेर चुरशीची झाली ! Maval Lok Sabha

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणूकीत मावळात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 11, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 साली निर्मिती झाली. तेव्हा मावळमधून 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेने विजय मिळवला. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे राहिला. 2009 साली गजानन बाबर यांच्यानंतर 2014 आणि 2019 अशी सलग दोनदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडून आले. 2022 साली शिवसेना पक्षात फुट पडली. त्यात श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवायचीच होती, आणि त्यांनी तिकीटही मिळवले. त्याचवेळी त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे ह्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे मावळची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणूकीत मावळात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर आहेत. शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदेच्या हाती आहे. त्यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीचीही साथ आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची ताकद मोठी बनली. पर्यायाने मावळ लोकसभेत देखील महायुतीची ताकद मोठी असल्याचे दिसत होते. मावळात प्रथमच एका उमेदवाराच्या पाठी लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्याचे चित्र राज्याचे पाहिले. त्याअर्थी श्रीरंग बारणे यांची बाजू जड होती. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Campaign Analysis )

परंतू प्रचारादरम्यान वातावरण बदलले आणि मावळ लोकसभेची निवडणूक जी सुरुवातीला एकतर्फी वाटत होती, ती चुरशीची बनली. संजोग वाघेरे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मावळ लोकसभेचा कोपरा न कोपरा पिंजून काढला. त्यांना मविआच्या नेत्यांचीही साथ मिळाली. मविआच्या प्रमुख नेत्यांनी वाघेरेंसाठी सभा, बैठका, रॅल्या घेतल्या. त्यामुळे मावळची निवडणूक जी एकतर्फी होती ती चुरशीची बनली आणि दोन्ही पक्षांसाठी आव्हानात्म बनली.

अधिक वाचा –
– ‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका

Next Post

दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
drowning

दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.