Talegaon Dabhade Nagar Parishad News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील 161 इमारती मोडकळीस आल्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत. या इमारती त्वरीत पाडून टाकाव्यात, अशा लेखी सूचना नगरपरिषदेच्यावतीने मिळकतदारांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक इमारत पडल्यास घरमालकच जबाबदार राहील, असे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नगर रचनाकार विश्वजीत कदम यांच्या मार्फत गेल्या महिन्यात सर्व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 161 मिळकतधारकांना त्यांच्या इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या. या धोकादायक इमारतीमुळे जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते, अशी घटना घडली; तर त्याला सर्वस्वी घरमालकच जबाबदार राहील. त्या घटनेला नगरपरिषद जबाबदार राहणार नाही. तरी ज्यांच्या इमारतीत धोकादायक आहे. त्यांनी तातडीने काढून घ्याव्यात, असे नगर परिषदेने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे. ( 161 Buildings Are Dangerous In Talegaon Dabhade Nagar Parishad Limits )
आपल्या इमारती धोकादायक आहेत अथवा नाहीत त्याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंत्याकडून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. ते नगर परिषदेला निदर्शनास आणून द्यावे, असेही नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. “तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. अशावेळी जुन्या घरांना धोका असतो. तो धोका होऊ नये, त्यासाठी धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी स्वतःहून धोकादायक घरे काढून घ्यावीत. अशा इमारती पडल्यास घरमालकच जबाबदार राहतील,” असे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– मोहितेवाडी येथे ‘मनसे’कडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Maval News
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती
– BREAKING ! मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू