बांगलादेश मध्ये रविवारी (दिनांक 19 मार्च) भीषण अपघात झाला. एक भरधाव बस महामार्गावरील पुलावरुन खाली कोसळल्याने झालेल्या गंभीर अपघातात तब्बल 17 जण ठार झालेत, तर 30 जण जखमी झालेत. प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास मदारीपूरमधील एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. जखमींपैकी अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ( 17 Persons Killed 30 Injured In Road Accident In Bangladesh )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बसमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच चाक फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पुलावरुन 30 फूट खोल खाली खड्ड्यात कोसळली असे अग्निशमन दलाने सांगितले. अपघातातील बऱ्याच मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून अनेक जखमींचीही ओळख पटलेली नाही. या बसमध्ये 45 हून अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर येत आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारकडून 25 हजार तर जखमींना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
अधिक वाचा –
– PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती
– बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके