प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) यवतमाळ येथे विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ झाला. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रूपये आणि महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रूपयांचे वितरण केले. तसेच राज्यातील सुमारे 5 हजार कोटी रूपये निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ( 21 thousand crore distributed to 9 crore beneficiary farmers of PM Kisan Yojana by Narendra Modi )
मागील 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतकऱ्यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री यांचे लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर