व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी वितरित । PM Kisan Yojana

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
pm-kisan-yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) यवतमाळ येथे विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ झाला. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रूपये आणि महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रूपयांचे वितरण केले. तसेच राज्यातील सुमारे 5 हजार कोटी रूपये निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ( 21 thousand crore distributed to 9 crore beneficiary farmers of PM Kisan Yojana by Narendra Modi )

मागील 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतकऱ्यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री यांचे लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर


Previous Post

स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News

Next Post

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharashtra-State-Excise-Department

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.